The Uday Sea & Coastal Level Flood Line System

महापुर प्रतिबंधात्मक 'वर्षा-वसुंधरा' प्रकल्प

'वर्षा-वसुंधरा' आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् |'


SUMMARY

During the rainy season of 2019, in the months of July and August, due to heavy rainfall in the Krishna Valley, an unprecedented flood situation had arisen. Sangli and Kolhapur districts in particular were severely affected. There were a huge losses of lives and properties.

Accordingly, a committee was set up as per Government Resolution dated 23rd August 2019 to find out the causes of floods in Bhima and Krishna valleys in the year 2019 and to prepare future remedial reports. The above committee has so far studied the dimensions of rain and overflow warning, integrated reservoir operation, emergency action plan and mechanism, use of new technology and algorithms for flood control and forecasting and visited the flood affected area of ​​Sangli, Kolhapur district on 23rd and 24th September 2019.

Krishna Upakho's study report has been submitted to the government. In this report, the committee has made a total of 18 recommendations. The matter of acceptance of the recommendations made by this committee was under consideration of the Government.

Governance Decision:Krishna Valley Flood Study Committee It has been decided to accept, reject and accept the recommendations of Krishna Upakho's study report submitted to the government on May 27, 2020. Details of the decision taken by the government are given in Annexure "A".

The Uday Sea & Coastal Level Flood Line System
The Uday Sea & Coastal Level Flood Line System

Demography of Kolhapur

The city is situated at a height of 1790 feet above mean sea level and 16-42 North latitude and 74-14 East longitude. The city stands on the bank of river Panchaganga, a tributary of the river Krishna

The Kolhapur city is situated at 16.7000 N latitude and 74.2333 E longitude. Stand on a rising ground about 1790 feet above the sea level.

The topography of the city shows many undulations and the ground is generally sloping from south to north towards the Panchaganga River. It has on area of 66.82 Sq.Kms.

In History, Kolhapur the premier State in the Southern Maratha State lies between Latitude  15°73’ to  17°11’ and Longitude 73°75’ to 74°70’. Kolhapur is situated at 546 meter height from sea level and its proximity to the eastern slopes of the Sahyadri renders the greater part of the State almost immune from famine and even from scarcity.

उदय घाटगे यांच्या महापुर प्रतिबंधात्मक 'वर्षा-वसुंधरा' प्रकल्पाची नीती आयोगाकडून दखल

कोल्हापूरच्या युवा संशोधकाची 'उदय सी अँड कोस्टल लेव्हल फ्लडलाईन सिस्टिम्स'

  • महापूर हि सध्या देशातील अनेक भागांची प्रमुख समस्या बनली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या परिसरात होणारी अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या महाभयानक महापुराचा तडाखा गेल्या तीन वर्षात दोनवेळा पंचगंगा आणि कृष्णाकाठच्या लोकांना बसला आहे. या महापुरावरती पर्याय शोधण्यासाठी शासन तसेच अनेक संस्था संशोधन करत आहेत. या समस्येवरती एक रामबाण उपाय कोल्हापूरचे युवा संशोधक उदय घाटगे यांनी त्यांच्या 'वर्षा-वसुंधरा' या प्रकल्पाद्वारे दिला असून त्यांनी हा प्रस्ताव नीती आयोगाकडे पाठवला असून त्या प्रस्तावाची दखल नीती आयोगाने घेऊन त्याची अभ्यासांतर्गत असलेल्या ६ वेगवेगळ्या विषयांच्या अंतिम प्रकल्प यादीमध्ये निवड केली आहे.

  • महापूर आणि महानुकसान

    गेला महापूर अनेक अर्थानी प्रचंड नुकसानीचा ठरला. प्रचंड आणि ऐतिहासिक झालेल्या या ढगफुटीमध्ये जवळजवळ २१३ लोकांना प्राण गमवावा लागला. ४,५०,००० लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित करण्यात आले. एकट्या कोल्हापुरात ४००० कोटी हे खासगी मालमत्तेचे, १२०० कोटी विद्युत यंत्रणेचे, , १५०० कोटी रस्ते व पूल नुकसान, तर जवळपास ३,३८,००० हेक्टर पिकांची नासाडी झाली . कोल्हापुरात पंचगंगा नदीची धोक्याची पातळी ४३ फूट असून या महापुरात नदीचे पाणी ५५ फुटांवरती होते. महापुराचे नाव निघताच पंचगंगा, कृष्णा काठच्या रहिवाश्यांच्या अंगावर शहारे निर्माण होतात. महापुरामुळे प्रचंड जीवित, वित्त, कृषी, पर्यावरण आणि मानसिक हानी तर होतेच पण सर्वात महत्वाचे म्हणजे जमिनीची सुपीकता नष्ट होऊन उपजाऊ जमिनीचे शेकडा प्रमाण कमी होते.

  • 'वर्षा-वसुंधरा' आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् |'

    जगभरात कोणताही महापूर हा स्थलांतरित केला जात नाही तर त्याचे व्यवस्थापन केले जाते. कोणताही महापूर आल्यानंतर त्यावरती उपाययोजना करणे हि वेगळी बाब असून महापु येऊच न देणे हि वेगळी प्रतिबंधात्मक बाब आहे. देशभरात महापूर समस्येवरती अनेक स्तरांवरती समाधान शोधण्याचे काम चालू आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी उत्तर म्हणून काय करता येईल याबाबत कोल्हापूरचे युवा संशोधक उदय घाटगे गेल्या ३ वर्षांपासून संशोधन करत आहेत आणि त्यांच्या अभ्यासातून त्यांनी 'वर्षा -वसुंधरा' ही संकल्पना मांडली. या संकल्पेनेला त्यांनी संस्कृतमधल्या 'आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् |' या सुभाषिताचा आधार देत पावसातून पडलेलं पाणी हे समुद्रालाच मिळते आणि त्यामुळे महापुराचे हे अतिरिक्त पाणी नुकसान करून नदीद्वारे समुद्रामध्ये जाण्यापेक्षा थेट वर्षा-वसुंधरा जलबोगद्याद्वारे हे पाणी समुद्रामध्येच सोडण्याचा हा प्रकल्प असल्याचे सांगितले. त्यासाठी आवश्यक अशी 'उदय सी अँड कोस्टल लेव्हल फ्लडलाईन सिस्टिम्स ' ही व्यवस्था उभी करून हे पाणी समुद्रात सोडण्यात येईल.

  • उदय सी अँड कोस्टल लेव्हल फ्लडलाईन सिस्टिम्स :

    ५ मीटरच्या ३ वेगवेगळ्या पाईप महापुराच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वापरण्यात येतील हे पाणी पाइपलाइनच्या माध्यमातून ५५ किलोमीटर जमिनीखालून व ७७ किलोमीटर जमिनीवरून असा १३२ किलोमीटर प्रवास करून समुद्रात सोडण्यात येईल. एखाद्या पाईपला अडचण आल्यास प्रोजेक्ट्ला अडथळा होऊ नये म्हणून एकूण ३ पाईप ठेवण्यात आलेल्या आहेत.

    the uday sea and coastal level flood line system
  • महापूर देशाची समस्या आणि नीती आयोगाची दखल

    देशात दरवर्षी अनेक राज्यांमध्ये महापुरामुळे प्रचंड नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत होते. या समस्येवरती उपाय म्हणून हा प्रकल्प पायलट म्हणून राबविण्यात येईल व त्यानंतर याची अंमलबजावणी देशातील इतर भागातदेखील करण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन हे मोठं काम असून त्यामध्ये पूरव्यवस्थापनासाठी वेगळे असे मंत्रालय नाही. त्यामुळे महापूर समस्येवरती तोडगा शोधण्याची गरज लक्षात घेऊन नीती आयोगाने उदय घाटगे यांच्या प्रस्ताव, चर्चा व प्रेझेंटेशननंतर हा प्रस्ताव राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण यांच्याकडे सोपवला असून त्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे घाटगे यांनी सांगितले.

  • ३०-४० टीएमसी अतिरिक्त पाणी आणि कृष्ण खोरे विकास मंडळ

    उदय घाटगे यांच्या प्रस्तावित प्रकल्पानुसार कृष्णेचे किंवा पंचगंगेचे नियमित पाणी किंवा पुराचे पाणी नव्हे तर महापुराची परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत असणारे अतिरिक्त ३०-४० टीएमसी पाणी समुद्रात सोडण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे कृष्ण खोरे विकास मंडळ आणि कृष्णा तंटा लवाद यांच्या आक्षेपांचा प्रश्न येणार नाही. हे अतिरिक्त पाणी पुढं सरकवत महापुराची व्याप्ती वाढविण्यापेक्षा पाणी पहिल्या टप्प्यातच निचरा करण्याला पाठींबा मिळावा. हेच पाणी कर्नाटक आणि आंध्रप्रदेश याठिकाणी देखील पूरपरिस्थिती निर्माण करण्यास काहीअंशी कारणीभूत ठरत आहे. सदर प्रकल्प जरी कार्यान्वित झाला तरी त्याचे नियमितीकरण करण्यासाठी महापुराचे पाणी या प्रकल्पाद्वारे निचरा करण्याच्या चार चाचण्या करण्यात येतील .

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट व पाठपुरावा

    अनेक युवकांचे प्रेरणास्थान असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांना उदय घाटगे यांनी भेटून सदर प्रकल्पाची माहिती दिली व या योजनेला सरकार दरबारी मांडण्याबाबत मदत करण्याचे आवाहन केले. गडकरीजी यांनी घाटगे यांच्या अभ्यासाची माहिती घेऊन हे अतिरिक्त पाणी समुद्रात सोडण्याऐवजी अजून कुठल्या भागाला लाभधारक ठरू शकते का याचा अभ्यास करण्याच्या सूचना घाटगे यांना केल्या व या सूचनांचा सकारात्मक पाठपुरावा व अभ्यास सुरु असल्याचे श्री घाटगे यांनी सांगितले आहे.

  • भविष्य आणि चिंता

    हिंदीमध्ये एक म्हण आहे, 'अगर आप बारिश नहीं रोक सकते, तो कम से कम छाता खोलकर भीगनेसे तो बच सकते हैं !' अतिवृष्टी, ढगफुटी, महापूर या गोष्टी थांबवणे आज माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत त्यामुळे या समस्येपासून वाचण्यासाठी योग्य वेळेत योग्य उपाययोजना करणे हि काळाची गरज बनली आहे. कोल्हापूरचे भौगोलिक स्थान अतिवृष्टीचे असल्याने याठिकाणी भरपूर पाऊस पडणे आणि महापूर येणे ही भविष्यातील शक्यता नाकारता येत नाही. आणि अभ्यास हे सांगतो कि ज्या ज्या ठिकाणी महापूर येण्याचे प्रमाण आहे त्याठिकाणी कसण्यायोग्य जमिनीचे प्रमाण अल्प होत गेले आहे. याचे जिवंत उदाहरण आपल्याला नायजेरिया सारख्या देशात बघायला मिळते. शेती आणि उद्योगधंदे हा कोल्हापूरचा कणा आहे आणि महापूराचा तडाखा या दोन्ही गोष्टींना प्रचंड प्रमाणात बसत आहे.

  • नैतिक पाठबळ आणि तज्ज्ञांना आवाहन

    कोल्हापूरचे सुपुत्र असलेले आणि इस्रोबरोबर काम असलेले संशोधक उदय घाटगे हे गेल्या अनेक वर्षांपासून महापूर या समस्येवरती आणि त्याच्यावर समाधान शोधण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असून हा प्रकल्प आणि त्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना जनाधार आणि नैतिक पाठबळाची गरज असून ज्या लोकांना, संस्थांना या प्रकल्पामध्ये रस आहे आणि काही सूचना किंवा माहिती द्यावयाची आहे त्यांनी उदय घाटगे यांच्याशी घाटगे हाऊस, कदमवाडी कोल्हापूर येथे संपर्क साधावा जेणेकरून या प्रकल्पाची गरज ही एक लोकचळवळ बनेल.

The Uday Sea & Coastal Level Flood Line System

KOLHAPUR FLOODS & DISASTER MANAGEMENT

Project Details Information